सध्या देशात नव्हे तर संपूर्ण जगात प्लास्टिक बंदी जोर धरतेय. प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम आपण अनेक वेळा वेगवेगळ्या उधराहरणातून पाहतोच आहे. प्लास्टिकवर असलेल्या बंदीमुळे अनेक जणांनी नवे पर्याय शोधले खरे मात्र यामुळे प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर वाया जाऊ लागलं. मग या वाया गेलेल्या प्लास्टिकचा काय वापर करता येऊ शकतो, हा विचार तुमच्या आमच्या मनात जरी आला नसला तरी पुण्यातील अमिता देशपांडे यांच्या मनात आला. अमिता देशपांडे यांनी वेस्टड म्हणजेच वाया गेलेला कचऱ्याच चरक्याच्या माध्यमातून त्यावर प्रक्रियाकरून आकर्षक अश्या टिकाऊ वस्तू बनवायला सुरुवात केली. त्या गेल्या 7 वर्षांपासून रि चरखा नावाने टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवत आहेतकॉलेज मध्ये असताना अमिता गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करत असताना त्यांना तिथे मोठ्या प्रमाणात कचरा आढळून आला. अश्या वेळी या प्लास्टिकच काहीतरी केलं पाहिजे हा विचार घेऊन त्यांनी रि चरखा सुरू केलं..